आम्ही काय करतो?

समाज अधिक शिक्षित, कुशल आणि सक्षम व्हावा, या विश्वासाने आम्ही प्रत्येक उपक्रम राबवतो.

Overview


जिथे गरज, तिथे पोहोचणं.
हेच लोकधाराचं ध्येय!

शिक्षण, जागरूकता आणि एकत्रित प्रयत्नांच्या बळावर ग्रामीण आणि वंचित समुदायांमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी आम्ही काम करतो, जेणेकरून प्रत्येकाला स्वतःच्या भविष्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जाता येईल.

+
बालमने संस्कारित


विभागात कार्यरत
शाळा, आदिवासी पाडे
स्वयंसेवक

आमचे मुख्य उपक्रम

शिक्षण अन् कौशल्ये..

ग्रामीण शासकीय शाळांमध्ये शैक्षणिक आणि कौशल्य बळ देण्यासाठी

सध्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही जिल्हा परिषद शाळांसोबत लोकधारा काम करते. शैक्षणिक, मूल्य शिक्षण तसेच कौशल्याआधारित उपक्रम राबवून आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांचं शिकणं अधिक परिणामकारक कसं करता येईल हा आमचा प्रयत्न असतो. आमच्या कामाचे काही प्रमुख भाग जसे:

आत्मविश्वास व संवादकौशल्य विकासासाठी संभाषणात्मक इंग्रजी सत्र .
खेळ आणि शारीरिक उपक्रमांद्वारे टीमवर्क आणि शिस्तीला प्रोत्साहन.
मुलांना नागरी हक्क, कर्तव्ये आणि मूल्यांची ओळख करून देणारे उपक्रम
Lokdhara

सामाजिक..

गावांमध्ये सामाजिक जनजागृतीसाठी उपक्रम

जागरूकता आणि सुजाण निर्णयक्षमता यावरच मजबूत समाज उभा राहतो.”
“यासाठी लोकधारा गावपातळीवर विविध जनजागृती मोहिमा राबवते, ज्यातून ग्रामस्थांना पुढील बाबींविषयी माहिती दिली जाते:

कायदेशीर हक्क
कायदा आणि न्यायप्रक्रियेची समज
शासकीय योजना व सार्वजनिक सेवांबाबत जनजागृती

सक्षमीकरण..

महिला आणि युवक सक्षमीकरण

महिला आणि तरुणांमध्ये नेतृत्वगुण आणि कौशल्य विकास वाढावा, यासाठी लोकधारा विविध उपक्रम राबवते:

माहिती व जनजागृती कार्यक्रम
समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी
दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणारी कौशल्ये आणि मूल्य शिक्षणाची सत्रे