चला,
एकत्र बदल घडवूया.

तुमच्या योगदानामुळे आमचे उपक्रम अधिक परिणामकारकतेने राबवता येतील.
लोकधारा वेल्फेअर ट्रस्ट 12A व 80G नोंदणीकृत संस्था असून पात्र देणग्यांवर भारतीय कायद्यानुसार करसवलत उपलब्ध आहे.

तुम्ही कसा हातभार लावणार?

वेळ किंवा आर्थिक बळ; प्रत्येक योगदान महत्त्वाचं.

मूल्य

तुमच्या योगदानामुळे काय आणि कसा बदल घडतो?

01.
नवकल्पना

समाजातील अडचणींवर परिणामकारक आणि जबाबदारीने उपाय शोधण्यासाठी आम्ही व्यावहारिक आणि नव्या पद्धतींचा अवलंब करतो.

02.
एकत्रित प्रयत्न

स्वयंसेवक आणि स्थानिक लोकांसोबतच आवश्यक तेव्हा संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचीही साथ घेत आम्ही उपक्रम राबवतो.

03.
शाश्वतता.

दीर्घकालीन परिणाम साध्य करण्यासाठी आम्ही जबाबदारीने, संसाधनांचा योग्य वापर करून आणि पुढे वाढवता येतील अशा उपाययोजना राबवतो.

04.
पारदर्शकता

आमचे सर्व आर्थिक व्यवहार, प्रयत्न आणि निर्णय पारदर्शक आणि जबाबदारीने घेतले जातात.

05.
मानधन.

वेळ आणि कौशल्य देणाऱ्या आमच्या स्वयंसेवक आणि तज्ज्ञांसाठी निधीचा एक भाग जबाबदारीने मानधन म्हणून दिला जातो.

06.
पायाभूत सुविधा.

आपल्या योगदानामुळे उपक्रमांसाठी लागणारी आवश्यक साधने, सुविधा आणि व्यवस्था उपलब्ध करून देता येतात.