एक दृष्टिक्षेप
आजकाल समाजाविषयी बोलणं खूप सोपं झालंय. सोशल मीडियावर चर्चा होतात, उणिवा दाखवल्या जातात, काय बदलायला हवं यावर मतं मांडली जातात.
पण मनात एक प्रश्न वारंवार येतो;
आपण फक्त बोलतो, पण बदल घडविण्यासाठी स्वतःहून कधी प्रयत्न करतो का?
नेमक्या याच प्रश्नातून उभी राहिली लोकधारा.
लोकधारा ही एखाद्या एखाद्या पूर्वनियोजित योजनेतून जन्मलेली संस्था नाही.
ती जन्मली एका साध्या जाणीवेतून,
बदल हवा असेल, तर त्यासाठी पुढे यावंच लागतं.
फक्त टीका करून काही बदलत नसतं.
लोक एकत्र येऊन सातत्याने काम करू लागले, तरच खरा फरक पडतो; हा आमचा विश्वास.
सुरुवात छोटी होती.
आजूबाजूला दिसणाऱ्या साध्या पण महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं.
शिक्षणाची गरज, कायदेशीर माहितीचा अभाव, आरोग्याबाबतची बेपर्वाई, पर्यावरणाची हानी, सार्वजनिक सुविधांमधील अडचणी;
हे सगळं पाहताना वाटलं, “इथे काहीतरी करायला हवं.”
लोकधाराचं काम ठराविक चौकटीत बसवलेलं नाही.
समोर जो प्रश्न उभा राहतो, त्यानुसार आम्ही पावलं उचलतो.
आमचा विश्वास सोपा आहे;
जागरूक, सहभागी आणि जबाबदार नागरिक असतील तर समाज मजबूत होतो.
म्हणूनच आम्ही लोकांना माहिती देतो, सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देतो आणि समाज व व्यवस्था यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न करतो.
समाजातील प्रश्नांवर उत्तर असल्याचं लोकधाराचा दावा नाही.
पण ते बदलाच्या दिशेने टाकलेलं एक छोटं, पण प्रामाणिक पाऊल आहे हे नक्की.
आणि हे पाऊल त्या प्रत्येकासाठी आहे,
ज्यांना वाटतं की “काहीतरी केलं पाहिजे.”
तर जबाबदारी स्वीकारून कृती करणं.
जागरूकता, प्रयत्न आणि सामूहिक सहभाग यांच्या बळावर वंचित घटकांना साथ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.त्याचबरोबर तुमच्या नवकल्पनांचं स्वागतच असेल.
आमच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखवल्याबद्दल धन्यवाद.


